जळगांव शहराध्यक्ष निवडीवरून काँग्रेसमध्ये धुसफूस; जळगाव जामोद शहरातील मुस्लिम समाजामध्ये नाराजीचा सूर..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
जळगांव जामोद: जळगांव जामोद शहर काँग्रेस अध्यक्षपदी अमर पाचपोर यांची नव्याने निवड झाली आहे. सदर निवडी ही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. मात्र जळगाव जामोद काँग्रेस शहराध्यक्ष पद यावेळेस मुस्लिम समाजाला मिळावे.याकरिता अनेक मुस्लिम युवक इच्छुक होते. परंतु शहराध्यक्ष पद मुस्लिम समाजाला न मिळाल्याने समाजात सर्वत्र नाराजीचा सूर असल्याचे एका व्हायरल ऑडिओ मधून दिसून येत आहे..
एका मुस्लिम युवकांनी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे नाराजी व्यक्त करून या निवडीचा परिणाम येणाऱ्या नगरपालिका निवडणूक दिसून येईल असे सुद्धा वक्तव्य त्यांनी केले आहे..




