मलकापूर शहरात अल्पवयीन मुलीचा अपहरण ?…शहरात खळबळ!

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

मलकापूर: मलकापूर शहरातुन आज शुक्रवारी 10 रोजी सकाळी धक्कादायक घटना समोर आली आहे.सकाळी सुमारे आठ वाजता गांधी चौक परिसरातून एक अल्पवयीन मुलचे अपहरण केल्याची बातमी समोर आली आहे.हे सिनेस्टाईलने अपहरण झाले असल्याच्या चर्चेने पालकवर्ग व नागरिकांमध्ये दहशद पसरली आहे.दरम्यान तीन संशयित अपहरण कर्त्यांना नागरिकांनी चांगल्याच चोप दिला आहे.या संशयित अपहरण कर्त्यांना मलकापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की,मलकापूर शहरातील गांधी चौक परिसरातून एका अल्पवयीन मुलीचा लाल रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये अपहरण केल्या गेले.अपहरणाची बातमी पोलिसांनी दिल्याने पोलिसांनी मलकापूर-बुलढाणा व अन्य मार्गावर नाकाबंदी केली गेली.दरम्यान मलकापूर-बुलढाणा मार्गावर येत असलेल्या लाल रंगाचा स्विफ्ट कार मोताळा रोडवरील मिर्झा हाऊस परिसरात वाहतूक पोलीस अंमलदार मंगेश पवार यांनी तत्परता दाखवत कारला अडवण्याचा प्रयत्न केला,मात्र चालकाने कार शेतात टाकली.कार थांबल्यानंतर लोकांनी या तीन अपहरणकर्त्यांना चांगलाच चोप दिला. व त्यांची कार जाळून टाकली.यावेळी बोरखेडी पोलिसांनी तीनही अपहरण कर्त्यांना ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीला सुखरूप कारच्या बाहेर काढले आहे. या तीनही अपहरणकर्त्याला बोरखेडी पोलिसानी मलकापूर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे..अपहरण करणारे हे बीड जिल्ह्याचे बोलल्या जात आहे.नेमका हा अपहरण करण्याचा कारण व  अपहरण करण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे.हे पोलीस तपास करीत आहे..तीनही अपहरण कर्त्यांवर अपहरणाचे व पोस्कोचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!