“डेंजर” आ.संजय गायकवाडांचे पूरग्रस्त व शेतकऱ्यांसाठी “डेंजर” पाऊल,विकले स्वतःचे प्लॉट…

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: अनेकदा बुलढाण्यात चर्चा रंगतांना शिवसेना,शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचा नांव आला की अनेकांच्या मनात धडकी भरते आणि रंगलेली चर्चेला पूर्णविराम मिळते. त्याचे कारण म्हणजे “डेंजर” असलेले आ. संजय गायकवाड आहे.मात्र “डेंजर” आ. संजय गायकवाड यांचा अनेकदा भावनिक आणि संवेदनशील स्वभावही समोर आला आहे.यावेळी तर “डेंजर” आ.संजय गायकवाडांनी पूरग्रस्त व शेतकऱ्यांसाठी “डेंजर” पाऊल उचलले आहे. त्यांनी आपल्या व आपल्या भावाच्या नावाने असलेला प्लॉट विकून त्यातून आलेली 25 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा करून टाकली आहे.आज 30 सप्टेंबर रोजी आपल्या मातोश्री कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. शिवाय प्लॉट विकून आणलेली 25 लाख रुपयांची रोकड देखील पत्रकारांना दाखविली.ही रोकड बँकेत टाकून 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत जमलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दसरा मेळाव्यात देण्यात येईल अशीही माहिती आ.संजय गायकवाड यांनी दिली.
अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व सर्व सामान्यांना फटका बसला आहे.शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे व पुराने झालेल्या तांडवाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने डोळ्यातून अश्रू येण्यापासून कोणी थांबू शकत नाही.आज पुरग्रस्त व शेतकऱ्यांना मदतीचे नितांत गरज आहे.याच अनुषंगाने अनेकांकडून मदतीचे हात पुढे येत आहे.या अनुषंगाने आ.संजय गायकवाड यांनी आपले दोन प्लॉटच विकून टाकले त्यातून आलेली 25 लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे.अनेकदा वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त भूमिका घेतलेल्या “डेंजर” आ.संजय गायकवाडांनी पूरग्रस्त व शेतकऱ्यांसाठी घेतलेले “डेंजर” पाऊलमुळे त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे त्यांची बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे. शिवाय त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही होत आहे.
-पत्रकार परिषदेत प्लॉट विक्री व्यवहारपत्राची प्रत केली सादर-
आ. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांप्रती तत्पर संवेदनशीलता दाखवून. त्यांनी विकलेले दोन्ही प्लॉटचा 25 लाख रुपयांचा विक्री व्यवहाराची प्रतच पत्रकारांना दाखवली. आणि त्यांनी अनेकांना मदत देण्यासंबधीचे आवाहन करीत सांगितले की, शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. अशा कठीण परिस्थितीत, केवळ सरकारनेच मदत करावी असे नाही सर्वांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा आणि मानवी संवेदनशीलता दाखवावी. त्यांनी इतर लोकप्रतिनिधी आणि सक्षम नागरिकांनाही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले



