महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात..
एक दिवसाचा वेतन मुख्यमंत्री सहाय्यक निधी मध्ये जमा करण्याचा केला निर्णय..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: अतिवृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर व सर्व सामान्यांना फटका बसला आहे.अनेकांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना व पीडित नागरिकांना मदतीचे हात पुढे करीत आहे.या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढं केले आहे.
महसूल कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचा निर्णय करण्यात आले आहे.राज्यभरातून जवळपास तीन करोड रुपयांचा निधी होणार जमा होणार आहे.बुलढाणा जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी देखील आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा करण्यासंबंधी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 700 ते 800 महसूल कर्मचारी आपले एक दिवसाचे वेतन देणार आहे.जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ हटकर, सचिव गजानन मोतेकर कोषाध्यक्ष राजेश जाधव,पतसंस्थेचे सचिव मिलिंद पाटील, अभिजीत पिंजरकर, रविकांत बंगाळे,महिला प्रतिनिधी सोनल वाघमारे श्रीमती मोगल श्रीमती इंगळे, दिनकर राठोड, अनंता कहाते व इतर कर्मचारी उपस्थित होते..




