युवा प्रबोधनकार प्रा.रविकिरण मोरे यांच्या परिवर्तनवादी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: श्री अनन्या साई शिक्षण क्रीडा व बहुउद्देशीय संस्था बुलढाणा,द्वारा संचालित अग्निज्वाला सांस्कृतिक उत्सव समिती बुलढाणाच्या वतीने युवा प्रबोधनकार प्रा.रविकिरण मोरे यांच्या शिव आणि भीम परिवर्तनवादी गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता स्थानिक चिंचोले चौक या ठिकाणी करण्यात आले आहे.
अग्निज्वाला सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीने 22 ऑक्टोबर 2025 ते 3 नोव्हेंबर 2025 पर्यंत युद्ध कला प्रशिक्षण, गोंधळ,जागरण,कीर्तन,प्रबोधन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 1ऑक्टोबर 2025 रोजी परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला असून संपूर्ण बहुजन महापुरुषांची विचारधारा गीत गायनाच्या माध्यमातून युवा प्रबोधनकार प्रा.रविकिरण मोरे सादर करणार आहेत तरी या कार्यक्रमाचा बुलढाण्यातील तमाम नागरिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन अग्नीज्वाला सांस्कृतिक उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




