पुन्हा नांदुरा हद्दीतील 8 अवैध बायो-डिझेलचे पंप सील! पण पंप उद्धवस्त करणे गरजेचे..

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: खांमगाव-मलकापूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या अवैध बायो-डिजल पंपाला उध्वस्त करण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी आदेश दिल्यानंतर आणि लोकप्रिय मराठी द्वारे पाठपुरवठा करीत असल्याने 27 सप्टेंबर रोजी मलकापूर एमआयडीसी परिसरातील दोन बायो-डिजल पंपाना एलसीबी आणि महसूल प्रशासनाने छापा टाकून 8 जणांवर गुन्हे दाखल करून सील ठोकले आहे.दरम्यान आज 29 सप्टेंबर रोजी देखील नांदुरा हद्दीतील नांदुरा पुरवठा अधिकारी पूनम थोरात मैडम यांच्या द्वारे नांदुरा येथील नवा बायपास जवळील 2, गुरुद्वारा समोरील 1, सहयोग हॉटेल वडनेरे भोलजी 1, फिरोज भाई ढाबा जवळचा 1,माऊली हॉटेल जवळचे 2 आणि पटेल हॉटेल जवळचा 1 असे अवैध बायो-डिजल सील करण्यात आले आहे.अवैध बायो-डिजल पंपावर सिलची कारवाई तर होत आहे.मात्र हे पंप उद्धवस्त करणे ही गरजेचे आहे.




