निमगाव येथील ज्ञानगंगा नदी पात्रात बुडून दोन युवक बेपत्ता.
गावकरी व सामाजिक कार्यकर्त्यांद्वारे शोध सुरु.

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा- तालुक्यातील निमगाव येथील ज्ञानगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात नदीपात्रातून मार्ग शोधत असलेले गावातील दोन तरुण बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना आज 28 सप्टेंबरच्या दुपारी घडली आहे.करण गजेंद्र भोंबळे वय 18 वर्ष व वैभव ज्ञानेश्वर फुके वय 25 वर्ष असे तरुणांचे नांव आहे.या बुडालेल्या तुरणांचे गावकरी नदीपात्रात शोध घेत आहेत.
निमगाव येथील दोन तरुण करण गजेंद्र भोंबळे वय 18 वर्ष व वैभव ज्ञानेश्वर फुके वय 25 वर्ष हे बुडत असल्याचे परिसरातील नागरिकांना दिसले. त्यांनी तात्काळ नदीपात्रात उड्या घेतल्या व मदतीचा प्रयत्न केला मात्र दोन्ही तरुण बुडून बेपत्ता झाले.
या वेळी पूर्णा नदीत आपत्तीत बचाव कार्य करणाऱ्या पथकाला पाचारण करण्यात आले मात्र त्यांनाही कुठलेच यश आले नाही.




