पोटच्या सैतान मुलाने आई-वडीलाच संपविले..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
चिखली: चिखली तालुक्यातील ग्राम किन्ही सवडद येथून आज 27 सप्टेंबरच्या संध्याकाळी हृदयद्रावक घटना सायंकाळी समोर आली आहे. सैतान पोटच्या मुलाने आपल्या आई-वडीलांची खाटेच्या पायाने डोक्यावर मारून-मारून हत्या केली आहे. कलावती बाई महादेव चोपडे (वय ७०) व महादेव त्र्यंबक चोपडे (वय ७५) असे मृतकांचे नांव आहे.दरम्यान हत्या करणाऱ्या सैतान मुलाचे गणेश महादेव चोपडे (वय अंदाजे ४५) असे नांव आहे.घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हत्या करणाऱ्या सैतान गणेशला ताब्यात घेतले आहे.या संतापजनक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
चिखली तालुक्यातील किन्हीं सवडत येथील गणेश महादेव चोपडे (वय अंदाजे ४५ वर्ष) याने संध्याकाळच्या वेळी घरात आई वडील एकटे असताना खाटेच्या पायाने आरोपी गणेशने वडील महादेव त्र्यंबक चोपडे यांच्यावर हल्ला करीत त्यांच्या डोक्याला व छातीवर अनेकदा जबर मारहाण केली.नंतर आईच्या डोक्यात ही वार केले व दोघांनाही संपविले.घरगुती वादातून हा प्रकार झाल्याचे प्रथम दर्शनी सांगण्यात येत आहे. पुढील तपास अमडापूर पोलीस करीत आहे.




