डीपीसीची बैठक सुरू असताना उद्धव सेनेकडून निदर्शने
शेतकरी कर्जमुक्ती आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निदर्शने... शेतकऱ्यांसह डीपीसीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमुक्ती आणि अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उद्धव सेनेच्या वतीने आज २६ सप्टेंबर शुक्रवारी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री व सहपालक मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू असताना कार्यालयाबाहेर प्रचंड निदर्शने करण्यात आली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
ढगफुटीसदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पिकांची अक्षरकक्ष: माती झालेली आहे. पिके पाण्यात बुडाली, तर हजारो हेक्टरवरील शेतजमीन खरडून अजिंठा डोंगर रांगामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पैनगंगेला पूर येऊन झाले नुकसान निघाली आहे. अशा स्थितीत संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ सरसकट जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या, अशी मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, यास गांभीर्याने न घेतल्यास आज २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांसह थेट घुसू, असा इशारा उद्धवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार आज शुक्रवारी बैठक सुरू असताना उद्धव सेनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले आणि प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलन करताना बैठकीमध्ये घुसू दिले नाही.




