स्वरविहार संगीत विद्यालयामध्ये डॉ.निलेश जाधव यांचा सत्कार..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: खांमगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.निलेश जाधव यांना नुकतीच तालुका आरोग्य अधिकारी मोताळा येथे नियुक्ती मिळाली आहे त्याबद्दल स्वरविहार संगीत विद्यालयांमध्ये त्यांचा सत्कार घेण्यात आला.
डॉ.निलेश जाधव खामगाव उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक शिस्तप्रिय,प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. आरोग्य विभागाचा त्यांचा दांडगा अभ्यास असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य विषयक सुविधा देण्यामध्ये व त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जनसामान्यांमध्ये सुद्धा त्यांची चांगली ख्याती आहे.नुकतेच त्यांना तालुका आरोग्य अधिकारी मोताळा येथे रुजू होण्याचे कार्यालयीन आदेश प्राप्त झाले असून येत्या काही दिवसात डॉ.निलेश जाधव मोताळा येथील आरोग्य विभागाचा प्रभार हाती घेणार आहेत.स्वरविहार संगीत विद्यालयात ते गायन विषयाचे नियमित धडे घेतात.त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वरविहार संगीत विद्यालयाचे संचालक प्रा.रविकिरण मोरे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.मिलिंद जाधव,अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके,आरोग्य विस्तार अधिकारी शरद कुमार ठाकूर,टॅक्स कन्सल्टंट ऍड.अमोल देशपांडे,डॉ.मंजुश्री खोब्रागडे,सेवानिवृत्त आरोग्य विस्तार अधिकारी लताताई गुर्जर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इंजिनिअर ज्योती खरे,अंतरंग म्युझिक थेरपी व मेडिटेशन सेंटरच्या अश्विनी घिरके,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील स्वास्थ्य अभ्यंगता वैशाली वानखेडे,नीलम श्रीवास्तव यांच्यासह स्वरविहार संगीत विद्यालयाचे सदस्य उपस्थित होते.




