शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा-जयश्री शेळके

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: मोताळा तालुक्यातील उबाळखेड, गुळभेली, नळकुंड, खामखेड, राहेरा, खडकी तसेच बुलडाणा तालुक्यातील पाडळी, गुम्मी, तराडखेड, मढ, इजलापूर या भागांमध्ये दोन दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली असून, या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज २४ सप्टेंबर रोजी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. तरीही शासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. काल शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत ही जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आहे. मात्र, नुकत्याच ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत अद्याप कोणतीही ठोस घोषणा शासनाकडून झालेली नाही. आता शासनाने केवळ तोंडाला पाने न पुसता सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.अशी मांगणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके यांनी केली आहे.




