थरारक,चाकूने वार करून प्रेयसीला संपवून स्वतःला संपविले..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
खामगाव: प्रेमात कधी काय घडेल हे सांगता येत नाही.असच प्रेमातून बुलढाणा जिल्ह्यातील खांमगाव हादरला आहे. खांमगाव शहरातील सजनपूरी जुगनू धाब्यावर, प्रियकराने चाकूने वार करून पैहीले प्रियेसीला संपवून स्वतःवर चालून वार करून स्वतःला संपविले.ही थरारक घटना आज मंगळवारी रात्री 8 ते 8:30 वाजेच्या सुमारास समोर आली आहे. साहिल उर्फ सोनू राजपूत आणि ऋतुजा खरात अशी मृतकांची नावे आहेत. त्यांचे वय 18 ते 22 होते.सदर युवक-युवती बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील असल्याची माहिती आहे. मागील अनेक वर्षांपासून दोघे प्रेम प्रकरणात अडकलेले होते.
सूत्रांकडुन माहिती मिळाली आहे की,साखरखेर्डा येथील सोहिल उर्फ सोनू राजपूत आणि ऋतुजा खरात यांच्यात अनेक वर्षांपासून प्रेम प्रकरण होते,ऋतुजा हवं खांमगाव मध्ये पॉलटेक्निक सेकंडिअर मध्ये शिक्षण घेत होती.अनेकदा साहिल आणि ऋतुजा हे दोघेही खांमगाव येथे येत होते.आज खांमगाव येथे आल्यानंतर सजनपूरी जुगनू धाब्यावर दोघे आल्यानंतर धाब्यावर ऋतुजा खरात नव्हे तर दुसऱ्या नावाचा आधार कार्ड देवून दोघेही धाब्याच्या एका रूम मध्ये गेले होते.दरम्यान धाब्याच्या काम करणाऱ्या एका कर्मचारीला सोहिल उर्फ सोनू राजपूत हा रक्तबंबाळ अवस्थेत रूमचा बाहेर पडलेला दिसला. रूममध्ये पाहल्यानंतर ऋतुजा देखील रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती.यावेळी दोघांचे मृत्यू झाला होता.साहिल ने चाकूने वार करून आपल्या प्रेयसी ऋतुजा संपवून स्वतःला संपविले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.मात्र इतकी थरारक घटना कोणत्या कारणामुळे घडली याची चौकशी पोलीस करीत आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा लोकांचा जमाव झाला होता. दरम्यान पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे.




