म्हणे…ऑफिसचा कारभार सुधरविण्यासाठी स्वतःकडे घेतले अप्रौल लॉगिन,मात्र कारणे आहे वेगळीच…

लोकप्रिय मराठीचा इम्पक्ट: दिवसभर ऑफिसला बसले प्रभारी डेप्युटी आरटीओ बिलावर..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: ठाणे मुंबई येथून 1 जुलै पासून रुजू झालेले प्रभारी बुलढाणा डेप्युटी आरटीओ म्हणून असलेले रघुवीर सिंग बिलावर यांनी आरटीओ ऑफिस मधील सर्व खाते प्रमुखांकडून पूर्वीपासून असलेले वाहन फोर पोर्टल मधील अप्रौलचे अधिकार काढल्याने व ऑफिसमध्ये पंधरा-पंधरा दिवस हजर राहत नसल्याने सर्वसामान्य व शेतकऱ्यांना आपल्या कामांसाठी डोकेदुखी वाढल्याची वस्तुस्थिती लोकप्रिय मराठीने समोर आणली होती.

यावर बुलढाणा प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर यांनी लोकप्रिय मराठी जवळ खुलासा केला आहे.आपण ऑफिसचा कारभार सुधरविण्यासाठी सर्व खाते प्रमुखांकडील असलेले अप्रौलची लॉगिनचे अधिकार आपल्याकडे घेतल्याचे सांगितले आहे.त्यांचे म्हणणे आहे,बनावट,बोगस कामे होवू नये म्हणून सर्व खाते प्रमुखांना त्या-त्या खात्याची कामे दिली आहे.नंतर कामांना लॉगिन मध्ये अप्रौल मी देणार आहे.शिवाय ९५ टक्के लोकांचे आणि शेतकऱ्यांचे कामे होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या खुलास्यामुळे या अगोदर खाते प्रमुखांकडे असलेल्या अप्रौल लॉगिन मध्ये बुलढाणा आरटीओ ऑफिसमध्ये अशी कोणती बनावट,बोगस कामे झाली आहे.असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

-जादुई छळीने केली जादू-

ऑफिसचा कारभार सुधरविण्यासाठी नाही तर जवळपास 25 वर्षपासून (1 वर्षाकरीता वाशीम गेल्याचे सोडून) सत्ताधारी नेत्यांकडून उपभोग घेवून बुलढाणा आरटीओ ऑफिसमध्ये एकाच खुर्चीला चिटकून बसणाऱ्या एका बाबू साहेबाने केलेल्या जादुई छळीच्या जादूने” “प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर यांनी सर्व खाते प्रमुखांकडची अप्रौलची लॉगिन काढल्याची आणि बाबू साहेबांच अप्रौल लॉगिन वापरण्याची चर्चा आरटीओ ऑफिसमध्ये रंगतांना दिसतेय”, हा जादू केवळ आरटीओ ऑफिसमधील “ऐजंट” आपल्याकडे वळती करण्याकरिता व प्रत्येक कामांचे ऐजंट कडून “जीफॉर्म”(शासकीय फी,व्यतिरिक्त अतिरिक्त घेतली जाणारी लाच) कमविण्याकरिता हा खटाटोप केले असल्याचे बोलल्या जातेय,मात्र या खटाटोपचा फटका शेतकरी व सर्वसामान्य जनतेला बसतय एवढे मात्र खरे.

-लोकप्रिय मराठीचा इम्पक्ट: दिवसभर ऑफिसला बसले प्रभारी डेप्युटी आरटीओ बिलावर-

बुलढाणा आरटीओ ऑफिस मधील सर्व खाते प्रमुखांकडून वाहन फोर मधील अप्रौलची लॉगिन स्वतः कडे घेतल्याने आणि पंधरा-पंधरा दिवस प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर ऑफिस मध्ये हजर राहत नसल्याने याची हकीकत लोकप्रिय मराठीने समोर आणली होती,लोकप्रिय मराठीच्या इम्पक्ट मुळे हप्त्याचा पहिला दिवस सोमवारी प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर हे दिवसभर बुलढाणा आरटीओ ऑफिस मध्ये बसले असल्याचे पाहायला मिळाले..

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!