बुलढाण्यात धारदार शस्त्राने युवकाचा मर्डर

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाण्यात दोन युवकांमध्ये धारदार शस्त्राने झालेल्या भांडणात एका 27 वर्षीय युवकाचा मर्डर झाल्याची घटना रविवारी 21 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.मर्डर झालेल्या युवकाचे नांव शुभम राऊत असे आहे.तो मच्छि ले आउट येथील रहवासी आहे.गांजा पिल्यानंतर नशेच्या धुंदीत दोन्ही युवकांमध्ये भांडण झाल्याचे चर्चिले जात आहे.
शुभम राऊत आणि ऋषी जवरे यांच्यात संगम चौकाजवळील पॅलेस चौकात जोरदार भांडण झाले.पाहता-पाहता दोघांमध्ये धारदार शस्त्राने भांडण झाले,दोघांच्या भांडणात शुभम राऊत याच्या पोटात वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.तर ऋषी जवरे हा देखील गंभीर जखमी झाला आहे.बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतक व जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले.




