लोणार न. पा. मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधातील फिर्यादीवर तात्काळ कार्यवाही करा

डॉ गोपाल बछिरे यांची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

लोणार: लोणार नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा व आरोग्यसेवा अधिकारी विरोधात संविधानचे आर्टिकल २१ चे उल्लंघन व बि.एन.एस. सेक्शन १२३ चा भंग या नुसार गुन्हा दाखल करा अशी फिर्याद पो.स्टे. लोणार येथे दिली होती. त्यावर त्यांनी कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केली आहे. फिर्यादी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांना भेटून सर्व पुरावे देऊन  तात्काळ कार्यवाही करावी अशी विनंती केली आहे.

सविस्तर बातमी अशी की नगरपरिषद लोणार येथील मुख्यधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे यांनी लोणार शहरास पिण्या योग्य स्वच्छ पाणी द्यावे परंतु त्यांना या विषयाचे गांभीर्य नसल्या कारणाने त्यांनी रीतसर या पाणी प्रकरणाकडे डोळे झाक केलेली आहे आणि त्यांच्या या कृतीमुळे पिवळ्या रंगाचे, दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी फिल्टर न करता जसेच्या तसे धरणातून पाण्याच्या टाकीत व पाण्याच्या टाकीतून नळाला महिना दोन महिन्यातून एक वेळा शहरास नळ योजनेमार्फत सोडण्यात येत आहे. या पाण्याचे नमुने मुख्य अनुजीव शास्त्रज्ञ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा बुलढाणा यांनी १२ डिसेंबर २०२३, ८ फेब्रुवारी २०२४, १८ सप्टेंबर २०२४, ४ सप्टेंबर २०२४, ४ मार्च २०२५, १७ एप्रिल २०२५ पाणी नमुन्याचा सूक्ष्मजीविय अहवालानुसार सदरील पाणी हे पिण्यास अयोग्य आहे असे स्पष्ट अहवाल म्हटले आहे. त्यामुळे नगर पालिका लोणार मुख्याधिकारी, पाणीपुरवठा, व आरोग्यसेवा अधिकारी हे
तीनही अधिकारी शिक्षेस पात्र आहे यांच्या विरोधात संविधान आर्टिकल २१ उल्लंघन तसेच BNS सेक्शन १२३ (IPC ३२८) नुसार जाणीवपूर्वक विषारी घटक युक्त, दूषित पाणी सामान्य जनतेला प्यायला देऊन त्यांच्या जीवाशी खेळून सतत जनसामान्याच्या जीवास दुखापत करणे विरोधात गुन्हा दाखल करून नियमाने कार्यवाही करावी अशी फिर्याद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ गोपाल बछिरे, यांनी लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.परंतु राजपत्रित अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने त्यांनी फिर्याद जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग केली व त्यामुळे संपूर्ण पुराव्यासह डॉ बछिरे यांनी जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेतली व संपूर्ण पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून तात्काळ कारवाई करण्याची मांगणी  केली.यावेळी त्यांच्यासह शहर प्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे तारामती जायभाये लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, प्रकाश सानप, तानाजी मापारी, तानाजी अंभोरे, शालिनीताई मोरे, अशपाक खान फहीम खान अमोल सुटे हे उपस्थित होते.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!