बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी पकडला 5 लाखांचा गुटखा.

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क

बुलढाणा : बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी एक धडाकेबाज कारवाई केली आहे.बुलढाणा ग्रामीण पोलिसांना गोपनीय मिळालेल्या माहिती वरून बुलढाणा-चिखली मार्गावरील साखळी बु. फाटा जवळ गुटख्याने भरलेल्या 15 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास अवैध गुटखा घेऊन जाणाऱ्या वाहनाला पोलीस पथकाने नाकाबंदी करीत पकडले.व आरोपी गजानन देविदास पेहरे रा. वरुड बु. ता. जाफ्राबाद व चालक सुनिल रामराव वाघ रा. अमोना ता. चिखली यांलाही अटक केली आहे.तर 5 लाख 21 हजार 170 रुपयांचा गुटखा व वाहनांसाह एकूण जवळपास 9 लाख 71 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पकडण्यात आलेल्या वाहनातून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी 1125 नग राज निवास सुगंधित पान मसाला पाकीट किंमत 2 लाख 25 हजार रूपये, 225 प्रीमियम आर एन जाफरानी जर्दा तंबाखु पाकीटे किंमत 56 हजार 250 रुपये, 200 पाकीटे केसर युक्त विमल पान मसाला किंमत 94 हजार रूपये, पांढऱ्या रंगाच्या 2 पोतडयामध्य बिग तंबाखू 6 हजार रूपये, 10 पांढऱ्या पोतडीमध्ये केसर युक्त विमल पान मसाला किंमत 43 हजार 560 रुपये, 10 बॅग मध्ये तंबाखू किंमत 4 हजार 840 रुपये, 416 लहान आकाराची केसर युक्त विमल पान मसाला पाकीटे किंमत 77 हजार 792 रुपये, पांढऱ्या रंगाच्या 2 पोतडयामध्ये किंमत 13 हजार 728 रुपये असा एकुण सुगंधीत सुपारी व तंबाकुचा एकुण किंमत 5 लाख 21 हजार 170 रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरचा गुटखा वाहुन नेण्यासाठी वापरण्यात आलेला मालवाहू वाहन एमएच 28 बीबी 7025 किंमत 4 लाख 50 हजार रुपये असा एकुण 9 लाख 71 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपीं विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश मोरे, पोहेकॉ. कैलास उगले, महादेव इंगळे, नारायण गावंडे, विकास सोनुने, पोकॉ. गजानन राजपूत, विष्णू गिते, ज्ञानेश्वर शेळके यांनी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सुरेश मोरे करीत आहे.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!