बाळाला बाजूला ठेवून आईची रेल्वेखाली आत्महत्या

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
शेगांव: घरगुती वादातून निर्माण झालेल्या तणावातून शेगाव तालुक्यातील जलंब येथील एका विवाहित महिलेने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नांव सौ कल्पना विठ्ठल घुले वय 22 असे असून ती जलंब येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ.कल्पना घुले ही विवाहिता आपल्या चिमुकल्या मुलाला घेऊन जलंब रेल्वे स्थानकाजवळ आली रागाच्या भरात तिने मुलाला बाजूला काही अंतरावर सोडले आणि अपलाईनवरील येणाऱ्या मालगाडीखाली उडी घेतली त्या तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.




