आइ लव्ह मोहम्मदचा फलक लावणाऱ्या तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे मागे घ्या

अल मदिना फाउंउेशनची राष्ट्रपतींना निवेदनाद्वारे मागणी

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ईद मिलाद-उन-नबीच्या शुभ प्रसंगी, सय्यद नगर परिसरातील तरुणांनी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल प्रेम दर्शवण्याच्या उद्देशाने एक फलक लावला, ज्यावर “आई लव मोहम्मद” असे लिहिले होते. तथापि, कानपूर पोलिसांनी हे फलक लावणाऱ्या सुमारे २५ मुस्लिम तरुणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या घटनेमुळे देशभरातील पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या अनुयायांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यावर्षी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या ईद मिलाद-उन-नबीची १५००वी जयंती होती. या ऐतिहासिक क्षणी कानपुर पोलिसांद्वारे अशी कार्रवाई करणे निंदनीय आहे.

भारतीय संविधानाच्या कलम १९-१-अ अंतर्गत प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम २५ अंतर्गत धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची हमी देण्यात आली आहे. शिवाय, कलम २१ नागरिकांना वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हमी देते. भारतीय संविधानाने दिलेल्या या अधिकारांना न जुमानता, विशिष्ट धर्माच्या अनुयायांविरुद्ध अशी एकतर्फी कारवाई केवळ अन्याय्यच नाही तर ती संविधानाच्या मूलभूत रचनेचेही उल्लंघन करते. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या कृतींमुळे देशभरातील मुस्लिम समुदायात मोठ्या प्रणावर संताप निर्माण झाला आहे. म्हणुन मा.राष्ट्रपती कार्यालयाने उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या निंदनीय घटनेकडे विशेष लक्ष द्यावे, सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, सर्व तरुणांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे त्वरित मागे घ्यावेत आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करण्यात सहभागी असलेल्या दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. अशी मागणी अल मदिना फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख यांनी जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपति महोदयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी हाफ़िज़ असलम, कारी कलीम, जुबेर शेख, वसीम खान, जावेद कुरैशी, ईमाद काज़ी, फरदीन शेख, नवाज़ मिर्ज़ा, सलमान खान, साजिद शेख, साकिब खान, शरीम शेख,फरहान शेख, अदनान शेख, मोहम्मद अयान, साजिद खान, तौसीफ़ शेख, सैयद अलीम, सय्यद तस्लीम, मुशीर खान, समीर पठान, मोहम्मद इत्यादि उपस्थित होते…

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!