नॅशनल हायवेवर इको कार व ट्रेलर मध्ये भिषण अपघात,अपघातात पाच जणांचा मृत्यू

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
मलकापूर (अनिलकुमार गोटी) : नॅशनल हायवे क्र.153 वर काल बुधवारी रात्री इको कार व ट्रेलर मध्ये टक्कर होवून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा जागीच व एकाचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तर कार मधील 4 जण जखमी झाले आहे.
मलकापूर नॅशनल हायवे क्र.153 च्या चिखली रनथम जवळ काल बुधवारी 17 सप्टेंबर रोजी मारुती इको कार ने हलगर्जीपणाने कार चालवून पुढे चालणाऱ्या ट्रेलर ला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की कारचा चुराळा झाला.या भिषण धडकेत इको कार मधील कार चालक साजिद अजीज बागवान सहीत 3 महिलांचा जागीच व उपचारा दरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला आहे. कार मधील 4 जण जखमी झाले आहे.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मलकापूर शहर ठाणेदार गणेश गिरी, एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार हेमराज कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी मलकापूर सामान्य रुग्णालयात पाठविले व विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.शिवाय अपघात स्थळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व मलकापूर तहसील के नायब तहसीलदार उगले घटनास्थळी पाहणी केली.अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे..




