वाहन फोर लॉगिन मधील सर्व अधिकार प्रभारी डेप्युटी आरटीओंकडे, कामे होत नसल्याने सामान्य नागरिक,शेतकऱ्यांची वाढली डोकेदुखी..

लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क
बुलढाणा: बुलढाणा आरटीओ कार्यालयाची प्रतिमा कोणत्या ना कोणत्या कारणाने मलिन होण्याचे प्रकार समोर येत आहे.यामुळेच बुलढाणा आरटीओ कार्यालय बदनाम झाले आहे. आत्ता पुन्हा प्रभारी डेप्युटी आरटीओच्या कामकाजामुळे पुन्हा बुलढाणा आरटीओ कार्यालय चर्चेत आले आहे. रघुवीर सिंग बिलावर नामक प्रभारी डेप्युटी आरटीओ यांनी वाहन फोर पोर्टल मधील आरटीओ कार्यालयातील खाते प्रमुखांकडील असलेले सर्व अधिकार स्वतः कडे घेतल्याने व पंधरा-पंधरा दिवस कार्यालयात उपस्थित होत नसल्याने आपले कामे घेवून येणाऱ्या सर्व सामान्य नागरिक,शेतकऱ्यांचे कामे होत नसल्याने या नागरिक व शेतकऱ्यांची डोके दुःखी व मनस्ताप वाढला आहे.मात्र महत्वाच्या सर्व कामांच्या अप्रौलचे स्वतः कडे ठेवल्याने व कामे लवकर होत नसल्याने आर्थिक व्यवहारापोटी हा प्रकार केल्याचे आरटीओ कार्यालय परिसरात चर्चा रंगतेय,मात्र याचा फटका तर सर्व सामान्य व शेतकऱ्यांना बसतोय एवढे मात्र नक्की.
बुलढाणा येथे एआरटीओ म्हणून ठाणे,मुंबई येथील रघुवीर सिंग बिलावर यांची काही महिन्यांपूर्वी नियुक्ती झालेली आहे.त्यांच्याकडे डेप्युटी आरटीओ पदचा प्रभारी पदभार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार जवळपास 1 सप्टेंबर पासून प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर यांनी वाहनांचे ट्रान्सफर अप्रौल, नवीन वाहन नंबर देण्याचे अप्रौल,जप्त केलेले वाहन सोडवण्याचे अप्रौल,लायसन्स ऑनलाईन करण्याचे अप्रौल, यासह अन्य महत्वाचे खात्यातील एचओडी म्हणजे प्रमुख यांच्याकडील वाहन फोर पोर्टल मधील अप्रौल देण्याचे अधिकार काढून आपल्याकडे घेतले आहे.या आगोदर वरील खात्याचे प्रमुख चौकशी करून काम पूर्ण करण्यासाठी अप्रौल देत होते.म्हणजे डेप्युटी आरटीओ असो वा नसो काम होत होते,आत्ता अर्थात प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर यांनी संबधीत कामाला अप्रौल दिले तरच सर्व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे कामे होतील,मात्र काही तांत्रिक कारणास्तव असो की अन्य कामानिमित्त पंधरा-पंधरा दिवस आरटीओ कार्यालयात प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर हे गैरहजर (अनुउपस्थित) असल्याने व कामे होत नसल्याने सर्व सामान्य नागरिक, शेतकऱ्यांना आपली कामे करण्यासाठी आरटीओ कार्यालयात चकरा मारावे लागत आहे.यामुळेच त्यांची डोकेदुखी वाढली आहे.शुक्रवारी 12 सप्टेंबर च्या नंतर दोन दिवस सुट्टी पूर्ण झाल्यानंतरही सोमवारी 15 सप्टेंबर,मंगळवारी 16 सप्टेंबर आणि आज बुधवारी 17 सप्टेंबर रोजी देखील ठाणे ,मुबई येथील असलेले प्रभारी डेप्युटी आरटीओ रघुवीर सिंग बिलावर हे आरटीओ कार्यालय बुलढाणा येथे उपस्थित न झाल्याने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे कामे थांबली आहे.अशा गंबीर बाबी कडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.जर यावर कुठलाच तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचा उद्रेक होईल एवढे मात्र नक्की.




