खामगावात अभियंता दिवशी पदग्रहण समारंभ व आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी

  1. लोकप्रिय मराठी न्यूज नेटवर्क

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे अभियंता दिवसाचे औचित्य साधून इंजिनियर पदग्रहण समारंभ आणि आधुनिक बांधकाम साहित्याची मोफत भव्य प्रदर्शनी उत्साहात पार पडली. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी मंत्री फुंडकर यांनी अभियंते हे समाजाच्या विकासाचे खरे शिल्पकार असल्याचे सांगत, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत व आधुनिक बांधकामाची दिशा दाखवण्याचे आवाहन केले. नव्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी पदग्रहण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती आधुनिक बांधकाम साहित्याची भव्य प्रदर्शनी. बांधकाम क्षेत्रातील अत्याधुनिक साहित्य, पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, तसेच बांधकामाशी संबंधित विविध उपकरणांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले.

यावेळी खामगाव शहरातील अनेक इंजिनियर, बांधकाम व्यावसायिक व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदर्शनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यामुळे स्थानिक बांधकाम व्यवसायाला नवीन दिशा मिळेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. यावेळी खामगाव शहरातील महेश मोकलकर सर, इस्माइल नजमी, पंकज कोठारी, शशांक देशपांडे, समीर दलाल, नितिन शाह, रतन भोंगे, चेतन अग्रवाल यांच्यासह खामगाव शहरातील सर्वच इंजिनियर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!