मुंबई महापालिका महापौराबाबत एकनाथ शिंदेंनी हा दाखवला विश्वास

लोकप्रिय मराठी न्युज नेटवर्क
मुंबई: आगामी होणाऱ्या मुबई महापालिकेच्या निवडणूकीत माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार असल्याचा विश्वास दाखवला आहे.महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय होईल, असा दावा देखील त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महायुतीच्या विकासकामांचा उल्लेख केला आणि भ्रष्टाचाराचा निषेध केला आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.यंदाच्या मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीत मुंबईकर परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. मुंबईतील काही नगरसेवकांनी महायुतीत प्रवेश केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केल्याचा अनुभव असलेला हे सर्व नगरसेवक आहेत. परंतु त्यांच्या प्रभागातील काही अडचणी आहेत. काही काम आहेत. त्या संदर्भातील विषय मांडले. मी मुख्यमंत्री असताना किंवा आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जी काम झाली नाहीत ते काम सध्या सुरू आहेत. सर्व कामासंदर्भात चर्चा झाली. जी काम होऊ शकली नाहीत ती सरकारच्या काळामध्ये महायुतीच्या काळामध्ये झाली. सिमेंट काँक्रीटचे रस्ते, आपला दवाखाना असेल किंवा इतर पालिकेची कामे असतील ती सर्व काम झाली. अडीच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती विधानसभा निवडणुकीत मिळाली,असेही शिंदे म्हणाले.
-शिंदेंचा ठाकरेंना टोल-
काही लोकांनी अनेक वर्षे मुंबईवर राज्य केले, पण मुंबईकडे त्यांनी फक्त सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणूनच पाहिले. कोविडच्या काळात लोक मरत असताना, काही जण मृतदेहांच्या बॅगमध्येही भ्रष्टाचार करत होते. असा भ्रष्टाचार करणाऱ्यांना मुंबईकर आता थारा देणार नाहीत. असा टोला ही नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.




