सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
शेती आणि पिके गेलीत पाण्याखाली पिकांचे नुकसान

सिंदखेडराजा (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजा तालुक्यात आज 15 सप्टेंबर च्या दुपारी फार मोठा पाऊस पडला आहे. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे हाताशी आलेले सोयाबीन आणि कपाशीचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.आहे या प्रचंड पावसामुळे शेतं जलमय झाली आहेत. यामुळे सिंदखेडराजा तालुक्यात पळसखेड चक्का या भागातही मोठे नुकसान झाले आहे.
या कोसळधारा पावसामुळे पातळगंगा नदीला पूर आला असून उंब्रज–देशमुख दोन गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे.तर किनगाव राजा शहराला पुराचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.




