मोताळा तहसीलदार हेमंत पाटील अँटी करप्शन च्या जाळ्यात…
अकोला अँटी करप्शन विभागाची कारवाई

बुलढाणा-मोताळा तालुक्यातील तहसीलदार हेमंत पाटील यांना अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील थळ येथील एका शेतकऱ्याने आपल्या वर्ग २ जमिनीचा वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज केला होता. मात्र संबंधित काम करून देण्यासाठी तहसीलदार हेमंत पाटील यांनी २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
शेतकरी अडचणीत असल्याने त्याने थेट अकोला अँटी करप्शन विभाग अकोला यांच्या धाव घेतली. अँटी करप्शन विभागाने तक्रारीची शहानिशा करून जाळे आखले. आज 14 सप्टेंबर रविवारी रोजी बुलढाणा येथे तहसीलदार हेमंत पाटील यांच्या राहत्या घरी पथकाने सापळा रचून शेतकऱ्याकडून मागितलेली २ लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना तहसीलदार हेमंत पाटील यांना रंगेहात पकडले.या धाडसी कारवाईमुळे मोताळा तालुक्यात तसेच जिल्ह्यात प्रशासनात खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत आणखी एका अधिकाऱ्याचा समावेश झाल्याने जनतेत अँटी करप्शन विभागाच्या कार्यवाहीचे कौतुक होत आहे.या कारवाई मध्ये अँटी करप्शन ब्युरोचे अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप,अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, अकोला उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल इंगोले, पोलीस अंमलदार दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदिप ताले, असलम शहा, निलेश शेगोकार, मपोहवा. अर्चना घोडेस्वार, चालक नफिस सर्व ला.प्र.वि. अकोला यांनी सहभाग घेतला.




