भारत-पाकिस्तान सामन्यावर गुजरातमधून सर्वाधिक ऑनलाईन जुगार
शिवसेनेचे नेते खा.राऊतांचा दावा

मुंबई-आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर मोठ्या प्रमाणात म्हणजे सुमारे दीड लाख कोटींचा ऑनलाईन जुगार झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते खा.संजय राऊत यांनी केला आहे.यात सर्वात मोठी उलाढाल गुजरातमधून झाली असून यात भारतीय जनता पक्षाच्या लोकांचा सहभाग असल्याचा व भारतीय क्रिकेट संघावर जय शहा यांच्याकडून दबाव असल्याचा दावाही आरोपही राऊतांनी केला आहे. खा.संजय राऊत यांच्या या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.आज 14 सप्टेंबर रोजी आशिया कपमध्ये रात्री 8 वाजता भारत-पाकिस्तान चा सामना आहे.




