आरोग्य मंत्र्यांची दसरखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट

बुलढाणा, दि. 12 : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुवारी शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन नव्याने उभारलेल्या इमारतीची पाहणी केली आणि केंद्रातील चालू कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.आरोग्य केंद्रातील सुविधा पाहून आरोग्य मंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पुढील कामकाज अधिक प्रभावीपणे राबवाव्यात आणि आरोग्य सेवांचा दर्जा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.या प्रसंगी आरोग्य सेवा उपसंचालक वाघचौरे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, तालुका आरोग्य अधिकारी मलकापूर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपसंचालक यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन केंद्राच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले.भेटीदरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेतला आणि स्वतःच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

लोकप्रिय मराठी

तुमचा विश्वास,आमची ताकद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!